रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या 200 भरती

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत [Raigad DCC bank recruitment] लिपिक पदांच्या 200 जागांसाठी भरती होत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण रायगड जिल्हा असून बँकेचे मुख्यालय अलिबाग मध्ये आहे, आज बँकेच्या एकूण 58 शाखा आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२४

  • पदाचे नाव: लिपिक
  • एकूण पदे: 200 पदे
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर,
  • संगणक पात्रता: MSCIT किंवा शासनमान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त (संगणक पदवी असल्यास अट शिथिल)
  • वयोमर्यादा: किमान 21 वर्ष -कमाल 42 वर्ष( दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.)
  • शुल्क : 590/- रुपये
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण रायगड जिल्हा.
  • परीक्षेचे ठिकाण: नवी मुंबई आणि संपूर्ण रायगड जिल्हा (आवश्यकतेनुसार इतर केंद्रावरही परीक्षा घेतली जाईल)
  • वेतन/ मानधन: प्रति महिन्यात 25000 रुपये.
  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
  • ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट- https://www.raigaddccbrecruitment.com/
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ सप्टेंबर २०२४

Raigad DCC Recruitment 2024 Dates :

अ.क्र.तपशीलदिनांक
1) ऑनलाइन संकेतस्थळावर अर्ज भरण्याचा कालावधी 14 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024
2) ऑनलाइन परीक्षा फी करण्याची अंतिम तारीख5 सप्टेंबर 2024
3) ऑनलाइन परीक्षा दिनांक नंतर बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल
4) परीक्षा प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी दिनांकनंतर बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल
5) कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांकऑनलाईन परिक्षा निकालानंतर बँकेच्या ई-मेल द्वारे प्रसिध्द करण्यात येईल.

निवड पद्धती:

  • बँक लिपिक या पदासाठी CBT म्हणजेच संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेमधील प्रश्न हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील.
  • परीक्षा एकूण 90 गुणांची राहील आणि यासाठी 90 मिनिटांचा परीक्षा कालावधी राहील.
  • ऑनलाइन परीक्षा खालील नमूद विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित राहील.
    • गणित
    • बँकिंग व सहकार
    • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
    • कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था
    • संगणक व माहिती तंत्रज्ञान
    • बुद्धिमापन चाचणी
  • परीक्षेचे माध्यम- इंग्रजी आणि मराठी
  • ऑनलाइन परीक्षा नंतर ऑनलाइन परीक्षा मधील प्राप्त गुणांनुसार 1:3 या प्रमाणानुसार उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात येईल आणि यादीतील उमेदवारास मुलाखतीस बोलवले जाईल.
  • मुलाखत एकूण दहा मार्कांची असेल यातील पाच मार्क हे शैक्षणिक पात्रता आणि पाच मार्क हे मुलाखतीसाठी असतील.
  • ऑनलाइन परीक्षा मधील मार्क आणि मुलाखतीचे मार्क यांची बेरीज करून उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.
  • निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा प्रोबेशन कालावधी सहा महिन्यांचा असेल या कालावधीमध्ये उमेदवारांना एकूण रुपये 18400 दरमहा वेतन दिले जाईल.

Leave a comment